Sudesh
सध्या इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात स्कॅम्स होत आहेत. स्कॅमर्स नवनवीन प्रकारांनी लोकांना गंडवत आहेत.
सध्या एका नवीन प्रकारचा स्कॅम भारतात वाढत चालला आहे.
'पिग बुचरिंग' असं या स्कॅमचं नाव आहे. याचा उगम चीनमध्ये झाला होता.
यामध्ये ज्याप्रमाणे एखाद्या पिगला मारण्यापूर्वी खाऊ-पिऊ घालून मोठं केलं जातं, त्याच प्रकारे हे स्कॅम काम करतं.
यामध्ये स्कॅमर्स आपल्या टार्गेटला मोठी रक्कम जिंकण्याचं आमिष देतात. सुरुवातीला या टार्गेटला काही रक्कम जिंकू दिली जाते.
रक्कम जिंकत गेल्यामुळे व्यक्तीचा हॅकर्सवर विश्वास बसतो, आणि ते मोठी रक्कम गुंतवतात.
यानंतर हॅकर्स कोणताही ट्रेस न ठेवता गायब होतात, आणि मग या व्यक्तीला आपली फसवणूक झाल्याचं कळतं.
या स्कॅमपासून बचावाचा एकमेव उपाय म्हणजे अनोळखी मेसेजना रिप्लाय न करणे, आणि आमिष दाखवणाऱ्या लिंक्सवर क्लिक न करणे.