आशुतोष मसगौंडे
पर्यटक काही काळ त्यांच्या पसंतीच्या महिलेशी लग्न करतात आणि ट्रीप संपल्यानंतर संपल्यानंतर घटस्फोट देतात. त्याला ‘आनंद विवाह’ म्हणजेच ‘प्लेजर मॅरेज’ म्हणतात.
दक्षिण पूर्व आशियाई देशांमध्ये प्लेजर मॅरेजचे प्रमाण वेगाने वाढत आहे. हे विशेषतः इंडोनेशियामध्ये खूप होत आहे.
लॉस एंजेलिस टाइम्सच्या रिपोर्टनुसार, इंडोनेशियामध्ये प्लेजर मॅरेज हा एक मोठा उद्योग बनला आहे.
इंडोनेशियात अनेक स्त्रिया आपला उदरनिर्वाह आणि पैसे कमवण्यासाठी प्लेजर मॅरेज करतात. यामुळे इंडोनेशियाच्या पर्यटन क्षेत्राला आणि स्थानिक अर्थव्यवस्थेलाही चालना मिळते.
इंडोनेशियामध्ये प्लेजर मॅरेज हा एक व्यवसाय बनला आहे. विशेषतः खेड्यापाड्यात राहणाऱ्या स्त्रियांचा या मोठा सहभाग आहे.
पैशाच्या लालसेपोटी काही महिलांचे कुटुंबीय त्यांच्यावर प्लेजर मॅरेजसाठी दबाव आणतात, तर काही महिला पैसे मिळवण्यासाठी स्वत:च्या इच्छेने हा व्यवसाय स्वीकारतात.
रिअल इस्टेट इंडस्ट्रीप्रमाणेच इथेही दलाल आहेत, जे पर्यटकांना त्यांच्या मागणीनुसार महिलांची ओळख करून देतात आणि दोघांची लग्ने लावतात.
इंडोनेशियाच्या डोंगराळ प्रदेशातील पंककमध्ये प्लेजर मॅरेज एक महत्त्वाचे आर्थिक साधन बनले आहे. ही प्रथा इतकी सामान्य झाली आहे की पुंककच्या डोंगराळ प्रदेशाच्या आसपासच्या गावांना "घटस्फोटित गावे" म्हणून संबोधले जाते.