Saisimran Ghashi
मुंबईमध्ये 'पॉड टॅक्सी' धावणार आहे.तुम्हाला BKC पर्यंत अगदी काही क्षणातच पोहोचवेल. हे नेमके काय तंत्रज्ञान आहे जाणून घ्या.
'पॉड टॅक्सी' ही ऑटोमेटेड इलेक्ट्रिक व्हेईकल आहे जी विनाड्राइवर एका टॅक्सीत एका वेळी सुमारे ८ प्रवासी बसू शकतात आणि १३ उभे राहून प्रवास करू शकतात.
जगातल्या सर्वात मोठ्या पॉड टॅक्सी सेवेसाठी ८१० कोटी रुपयांचे बजेट यमुना ऑथोरिटीने मंजूर केले होते.
भारतात नोएडामध्ये पहिली पॉड टॅक्सी जेवर विमानतळ ते फिल्मसिटीपर्यंत धावणार आहे.
या पॉड टॅक्सीची विशेष बाब म्हणजे ती ड्रायव्हरलेस आणि ऑटोमेटेड तर आहेच पण त्याचबरोबर फास्ट आणि इको-फ्रेंडली देखील आहे.
पॉड टॅक्सी सेवा पहिल्यांदा लंडनमध्ये सुरू झाली, ही 2010 पासून हीथ्रो विमानतळावर कार्यरत आहे.
BKC मध्ये ८.८० किलोमीटर लांबीची ही पॉड टॅक्सी मार्गिका असणार आहे. या मार्गिकेवर ३८ स्थानके असतील, ज्यामुळे BKC मध्ये सहज प्रवास करता येईल.
ही सेवा पूर्णपणे स्वचालित असेल. दर १५ ते ३० सेकंदांनी एखादी पॉड येत राहील, ज्यामुळे वांद्रे आणि कुर्ला स्टेशनसारख्या प्रमुख वाहतूक केंद्रांपर्यंत प्रवाशांची वाहतूक सुलभ होणार आहे.