Saisimran Ghashi
असे म्हणतात की सकाळी नाष्टा राजासारखा,दुपारचे जेवण मध्यमवर्गीयप्रमाणे आणि रात्रीचे जेवण गरीबाप्रमाणे करावे.
दिवसाचा शेवटचा आहार असल्याने दिवसभरातील आपल्या शरीराची ऊर्जा आवश्यकता पूर्ण करण्यासाठी रात्रीचे जेवण महत्त्वाचे असते.
योग्य वेळी जेवल्याने पचनक्रिया सुधारते, वजन नियंत्रणात राहते आणि झोप चांगली येते.
आयुर्वेदानुसार, रात्रीचे जेवण सूर्यास्तानंतर 2-3 तासांत करावे.
आधुनिक वैज्ञानिक संशोधनानुसार, झोपण्याच्या 3-4 तास आधी रात्रीचे जेवण करणे उत्तम असते.
रात्री उशिरा जेवल्याने वजन वाढणे, मधुमेह, उच्च रक्तदाब आणि अपचन यांसारख्या समस्या उद्भवू शकतात.
रात्रीचे जेवण हलके असावे. जेणेकरून ते पचायला सोपे जाते.
ही केवळ सामान्य माहिती आहे. आम्ही याची पुष्टी करत नाही. कोणतीही शंका असल्यास, आहारतज्ज्ञांचा सल्ला घ्या.