Saisimran Ghashi
सायनस म्हणजे नाकाच्या आसपास असणाऱ्या हाडांत असलेली पोकळी आहे, ज्यामध्ये हवा साठते. सायनसची सूज किंवा संसर्ग झाल्यास त्याला "सायनसाईटिस" म्हणतात.
सायनसची समस्या असल्यास नाक सतत बंद राहते, ज्यामुळे श्वास घेण्यात अडचण येते.
नाक आणि डोक्याच्या आसपास सूज येणे सायनसच्या त्रासाचे मुख्य लक्षण आहे.
सायनस सूजल्याने कपाळ, डोळ्यांच्या वर आणि कपाळाच्या बाजूला डोकेदुखी होते.
सायनस संसर्ग झाल्यास नाकातून पाणी सारखं वाहत असतं.
सायनसाच्या संसर्गामुळे घसा दुखतो आणि सतत खोकला येतो.
सायनस संसर्गामुळे व्यक्तीला थकवा जाणवतो आणि ताजेतवाने वाटत नाही.
सायनसाईटिसची लक्षणे दीर्घकाळ राहिल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, कारण योग्य उपचार केल्याने त्रास कमी होऊ शकतो.