भारताविरुद्ध ५ धावांची अमेरिकेला पेनल्टी बसलेला स्टॉप-क्लॉक नियम आहे काय?

Pranali Kodre

टी२० वर्ल्ड कप २०२४

टी२० वर्ल्ड कप २०२४ स्पर्धेत भारतीय संघाने अमेरिका संघाला ७ विकेट्सने पराभवाचा धक्का दिला.

India vs USA | Sakal

पेनल्टी

न्युयॉर्कला झालेल्या या सामन्यात अमेरिकेला ५ धावांच्या पेनल्टीही बसली, पण त्यांच्यावर ही कारवाई का झाली आणि तो नियम काय आहे माहित आहे का?

India vs USA | Sakal

५ धावांची पेनल्टी

भारतीय संघ १११ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करत असताना ३० चेंडूत ३५ धावांची गरज होती. पण याचवेळी अंपायर्सन स्टॉप क्लॉक नियमानुसार अमेरिकेवर ५ धावांची पेनल्टी लावली. त्यामुळे भारतासमोर ३० चेंडूत ३० धावा असे समीकरण झाले.

India vs USA | Sakal

स्टॉप क्लॉक नियम

सांगण्यासारखी गोष्ट अशी आयसीसीने स्टॉप क्लॉक नियम १ जून पासून कायमस्वरुपी लागू केला आहे.

India vs USA | Sakal

१ मिनिट

या नियमानुसार संघाला एक षटक टाकून झाल्यानंतर पुढचे षटक खेळण्यासाठी ६० सेकंदात म्हणजेच १ मिनिटात सज्ज रहावे लागते. यासाठी इलेक्ट्रॉनिक घड्याळ चालू केले जाते.

India vs USA | Stop Clock Rule | Sakal

तर लागते पेनल्टी

जर सामन्यात तीन वेळा एखाद्या संघाने ६० सेकंदापेक्षा जास्त वेळ पुढचे षटक खेळण्यासाठी लावला, तर तर त्या संघावर ५ धावांची पेनल्टी लागते.

India vs USA | Sakal

म्हणून अमेरिकेवर कारवाई

याच नियामानुसार अमेरिकेने तीन वेळ षटके सुरु करण्यासाठी एक मिनिटापेक्षा अधिकवेळ घेतला. त्यामुळे त्यांना पेनल्टीला सामोरे जावे लागले.

India vs USA | Sakal

स्लो ओव्हर रेट

दरम्यान, स्लो ओव्हर रेटचा नियम यापूर्वीपासून क्रिकेटमध्ये वापरला जातो. या नियमानुसार वनडेत ५० षटके साडेतीन तासात आणि टी२० मध्ये २० षटके १ तास २५ मिनिटात पूर्ण करावी लागतात. नाहीतर कारवाई केली जाते.

India vs USA | Sakal

टीम इंडिया न्युयॉर्कमधील सलग ३ विजयांनंतर पोहचली फ्लोरिडाला

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India | X/BCCI
येथे क्लिक करा