दिल्लीच्या पहिल्या सर्वात तरुण CM आतिशी यांचं वय, शिक्षण अन् संपत्ती किती?

Amit Ujagare (अमित उजागरे)

आतिशी मार्लेना या दिल्लीच्या ८ व्या मुख्यमंत्री बनल्या आहेत. त्या आत्तापर्यंतच्या दिल्लीच्या सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत.

Atishi Marlena

आतिशी या आम आदमी पार्टीच्या सदस्या असून यापूर्वी त्यांनी अरविंद केजरीवाल यांच्या सरकारमध्ये महत्वाची खाती सांभाळली आहेत.

Atishi Marlena

आतिशी यांचा जन्म ८ जून १९८१ रोजी दिल्ली विद्यापीठाचे प्रोफेसर विजय सिंह आणि त्रिप्ता वाही या दाम्पत्याच्या पोटी झाला. सध्या त्यांचं वय ४३ वर्षे आहे. त्यांचं राजपूत-पंजाबी असं मिश्र कुटुंब आहे.

Atishi Marlena

सिंह हे आडनाव असतानाही आतिशी यांच्या आई-वडिलांनी त्यांना मार्लेना हे आडनाव दिलं. मार्क्स आणि लेनिन यांच्या नावाचं हे मिश्रण आहे.

Atishi Marlena

सुरुवातीला स्प्रिंगडेल स्कूल त्यानंतर सेंट स्टिफन कॉलेजमधून इतिहास विषयात पदवी घेतल्यानंतर आतिशी या लंडनला ऑक्सफर्ड विद्यापीठात शिक्षणासाठी गेल्या.

Atishi Marlena

यानंतर २०१३ मध्ये त्यांनी आम आदमी पार्टीची स्थापना होण्यापूर्वीच धोरणात्मक कामात स्वतःला झोकून दिलं. त्यानंतर २०१९ ला त्यांनी गौतम गंभीर विरोधात लोकसभा लढवली होती. पुढे २०२० च्या दिल्ली विधानसभेला त्या आमदार झाल्या.

Atishi Marlena

त्यानंतर मनिष सिसोदिया, सत्येंद्र जैन, सौरभ भारद्वाज यांच्यासोबत आतिषी यांना दिल्ली सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रीपद दिलं गेलं.

Atishi Marlena

निवडणूक आयोगाकडं सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, आतिशी यांची एकूण संपत्ती (बँकांची खाती, गुंतवणूक) १ कोटी ४१ लाख रुपये इतकी आहे.

Atishi Marlena