Laxmikant Berde : लक्ष्मीकांत बेर्डेंच्या मृत्यूचं खरं कारण माहित आहे का?

सकाळ डिजिटल टीम

मराठी सृष्टी ओळखली जाते ती अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे या दिग्गजांमुळे.

Laxmikant Berde

या जोडीने मराठी चित्रपट सृष्टीचा एक काळ चांगलाच गाजवला होता.

Laxmikant Berde

विनोदी अभिनयाने या कलाकारांनी चित्रपटाचा प्रमुख नायक बनून प्रेक्षकांना मनसोक्त हसवलं.

Laxmikant Berde

लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या निधनानंतर ही पोकळी प्रकर्षाने जाणवली.

Laxmikant Berde

अभिनेत्री रुही सोबत त्यांनी आपला संसार थाटला होता.

Laxmikant Berde

रुही बेर्डे यांनी त्याअगोदर हिंदी मराठी चित्रपटांची नायिका म्हणून प्रसिद्धी मिळवली होती.

Laxmikant Berde

टूर टूर या नाटकाने लक्ष्मीकांत बेर्डे यांना चांगली ओळख मिळवून दिली.

Laxmikant Berde

गजरा मालिका, मराठी, हिंदी चित्रपट असा त्यांचा यशाचा आलेख चढताच राहीला.

Laxmikant Berde

लक्ष्मीकांत बेर्डे हे त्यांच्या आईच्या खूप जवळ होते. आईमुळेच मला विनोदी अभिनयाची जाण झाली असे ते नेहमी म्हणत.

Laxmikant Berde

आईच्या निधनाने लक्ष्मीकांत बेर्डे खचून गेले त्यानंतर वडीलांचेही निधन झाले.

Laxmikant Berde

अशातच ५ एप्रिल १९९८ रोजी रुहीचे देखील निधन झाले. या घटनेमुळे लक्ष्मीकांत बेर्डे खूपच खचले होते.

Laxmikant Berde

दरम्यान प्रिया अरुण यांच्याशी लग्न केल्यानंतर लक्ष्मीकांतला अभिनय आणि स्वानंदी ही दोन अपत्ये झाली.

Laxmikant Berde

मुलांसोबत वेळ घालवण्याचे त्यांच्या सोबत खेळण्याचे दिवस असतानाच लक्ष्मीकांत बेर्डे यांना किडनीच्या विकाराने ग्रासले.

Laxmikant Berde

आपल्या अखेरच्या दिवसात ते अंथरुणाला खिळून राहिले होते.

Laxmikant Berde

अशातच १६ डिसेंबर २००४ रोजी त्यांच्या निधनाच्या बातमीने अवघ्या सृष्टीला धक्का बसला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Laxmikant Berde