राहुल शेळके
केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभेच्या 288 जागांसाठीचे वेळापत्रक जाहीर केले आहे. संपूर्ण महाराष्ट्रात एकाच टप्प्यात मतदान होणार आहे.
निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले की, महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीची अधिसूचना 22 ऑक्टोबर रोजी जारी केली जाईल.
29 ऑक्टोबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करता येणार असून 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे.
महाराष्ट्रात 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. राज्यातील निवडणूक प्रक्रिया 25 नोव्हेंबरला पूर्ण होणार आहे.
पण केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आयुक्तांना किती पगार असतो हे तुम्हाला माहित आहे का?
मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयुक्तांचे वेतन सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीं इतके असते. निवडणूक आयुक्तांचे सध्याचे वेतन 350,000 रुपये प्रति महिना आहे.
त्यांचा कार्यकाळ 6 वर्ष किंवा 65 वर्ष वयोमर्यादेपर्यंत आहे.
मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयुक्त हे सहसा वरिष्ठ IAS अधिकारी असतात.