ऋषिकेश साळवी (Rushikesh Salvi)
वाईन असो की दारू त्यासोबत काय खावे असा प्रश्न तुम्हाला पडलाच असेल चला तर पाहूया कोणते असतील बेस्ट आरोग्यदायी साथीदार.
चिकन सूप किंवा मिक्स भाज्यांचे सूप, मटनाचा रस्सा हे आरोग्यदायी पर्याय आहेत. क्रीमयुक्त सूप टाळावे कारण त्यामुळे पचन प्रक्रियेस विलंब होतो.
शिजवलेले अन्न अल्कोहोलसह पचण्यास सोपे असते, म्हणून शिजवलेले ओट्स आरोग्यदायी साथीदार ठरू शकते.
सॅलडमध्ये प्रथिनांचा एक भाग असतो व साखरेची पातळी कमी होऊ शकते.
एवोकॅडोमध्ये निरोगी चरबी आणि प्रथिने असतात, ज्यामुळे अल्कोहोलचा प्रभाव कमी होतो तसेच यात पोटॅशियमचे प्रमाण जास्त असते.
अंड्यांमध्ये प्रथिनांचे प्रमाण जास्त असते. मुळात, प्रथिने समृद्ध असलेले कोणतेही अन्न कार्य करेल कारण ते अल्कोहोल शोषण कमी करते.
फळे अत्यंत आरोग्यदायी असतात आणि त्यात जास्त प्रमाणात पाणी असते जे अल्कोहोल पातळ करते. सफरचंद आतड्याची जळजळ कमी करण्यास मदत करतात, जी अल्कोहोल पिण्यामुळे होते.
बारमध्ये अल्कोहोलसह शेंगदाणे व काजू सर्व्ह करतात कारण त्यामध्ये चरबीचे प्रमाण जास्त असते जे अल्कोहोलचे शोषण कमी करण्यास मदत करतात.