Monika Lonkar –Kumbhar
उन्हाळ्यात आवडीने खाल्ले जाणारे फळ म्हणजे फणस होय.
लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच फणस खायला आवडते.
फणसाचे केवळ गरच खाल्ले जात नाहीत तर त्यापासून भाजी देखील बनवली जाते.
फणस खाल्ल्यानंतर तुम्ही काही गोष्टींचे सेवन करणे टाळायला हवे. अन्यथा तुमची पचनसंस्था बिघडू शकते.
फणसाचे सेवन केल्यावर लगेच दूध पिणे टाळा. जर तुम्ही असे केले तर तुमची पचनक्रिया बिघडू शकते.
फणसामध्ये असलेली संयुगे भेंडीमध्ये आढळणाऱ्या संयुगांसह एकत्रित होऊन त्वचेवर अॅलर्जी निर्माण करू शकतात. त्यामुळे, फणस खाल्ल्यावर भेंडीचे सेवन करू नका.
फणस खाल्ल्यानंतर त्यावर लगेच पपई खाऊ नका, यामुळे, आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात.