Anuradha Vipat
लग्नाआधी प्रत्येक मुला-मुलीने खाली दिलेल्या वैद्यकीय चाचण्या करून घेतल्या पाहिजेत
लग्नापूर्वी दोन्ही जोडीदारांनी जेनेटिक टेस्ट करून घ्यायला हवी. या चाचणीतून आपल्या जोडीदारास भविष्यात एखादा अनुवांशिक रोग होऊ शकतो का, याची माहिती मिळते.
दोन्ही जोडीदारांना ही टेस्ट करायला हवी. जेणेकरून लग्नानंतर दोघेही लैंगिक संसर्गाला बळी पडणार नाहीत.
लग्नानंतर एखाद्या महिलेला मूल झाले नाही तर तिलाच दोष दिला जातो. मात्र हे दोघांवर अवंलबून असते. त्यामुळे लग्नाच्या आधी दोघांनाही इनफर्टिलिटी स्क्रीनिंग टेस्ट करायला हवी
अनेक जोडप्यांना रक्त तपासणी करणे गरजेचे वाटत नाही, परंतु यामुळे त्यांना आरएच फॅक्टरबद्दल जाणून घेण्यास मदत होऊ शकते.
एचआयव्ही, हिपॅटायटीस बी आणि सी हे आजार आयुष्यभर राहणारे आहेत ज्यांचे योग्य व्यवस्थापन न केल्यास, विवाहित जीवनावर गंभीर परिणाम होऊ शकतो.