टोनर की मॉईश्चरायझर, चेहऱ्यावर सर्वात आधी काय लावायचे?

Monika Lonkar –Kumbhar

स्किनकेअर

आपल्या सर्वांना सुंदर आणि चमकदार त्वचा हवी आहे. परंतु, यासाठी आपण आपल्या त्वचेचा प्रकार आणि त्वचेच्या गरजा समजून घेऊन काळजी घेणे आवश्यक आहे.

Skin Care Tips

जर तुम्ही नियमितपणे स्किनकेअर रूटीन फॉलो केले तर त्वचेच्या अनेक समस्या तुम्हाला टाळता येतील.

Skin Care Tips

स्किनकेअर प्रॉडक्ट्स

तरूणींच्या स्किनकेअर प्रॉडक्ट्समध्ये अनेक गोष्टींचा समावेश होतो. मात्र, तुमच्या त्वचेच्या प्रकारानुसार आणि त्वचेला सूट होणाऱ्या प्रॉडक्ट्सचा यात समावेश असणे गरजेचे आहे.

Skin Care Tips

टोनर

चेहरा धुतल्यानंतर किंवा फेसवॉश केल्यानंतर चेहऱ्यावर स्किन टोनर लावणे गरजेचे आहे. स्किन टोनरमुळे चेहऱ्यावर जमा झालेली घाण, धूलिकण निघून जाण्यास मदत होते.

Skin Care Tips

मॉईश्चरायझर

अनेक महिला त्यांच्या स्किनकेअर रूटीनमध्ये मॉईश्चरायझरला वगळतात. मात्र, असे करू नका, जर तुम्ही मॉईश्चरायझर त्वचेवर लावले नाही तर त्वचा कोरडी आणि निस्तेज दिसू शकते.

Skin Care Tips

त्वचेसाठी मॉईश्चरायझर आणि स्किन टोनर किती आवश्यक आहे, हे तुम्हाला आता कळले असेलच. आता या दोन्हींमध्ये सुरूवातीला चेहऱ्यावर काय लावावे? असा प्रश्न अनेकांना पडतो.

Skin Care Tips

चेहरा स्वच्छ धुतल्यानंतर, चेहऱ्यावर सर्वात आधी स्किन टोनर लावा. त्यानंतर, मॉईश्चरायझर लावा. यामुळे, तुमचा चेहरा फ्रेश आणि हायड्रेटेड दिसेल.

Skin Care Tips

हिरव्या वेलवेट ड्रेसमध्ये प्रिया बापटचा 'ब्युटिफूल' अंदाज

Priya Bapat | esakal
येथे क्लिक करा.