मॉर्निंग वॉकची योग्य पद्धत माहित आहे का? चुकीच्या पद्धतीने चाललात तर होईल हे नुकसान

Aishwarya Musale

आरोग्य

मॉर्निंग वॉक हे आरोग्यासाठी उत्तम मानले जाते. जर तुम्ही रोज सकाळी काही पावले चालत असाल तर ते आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. मात्र, मॉर्निंग वॉकची पद्धत परिपूर्ण असावी.

morning walk | sakal

आजारी

जर तुम्ही सकाळी चुकीच्या मार्गाने चालत असाल तर त्यामुळे तुम्ही आजारी देखील होऊ शकता. तज्ज्ञांच्या मते, सकाळी चालण्याने स्नायू मजबूत, हाडे निरोगी, हृदय निरोगी आणि वजन नियंत्रित राहते.

morning walk | sakal

मॉर्निंग वॉक

मात्र, त्याची पद्धत योग्य नसेल तर ती हानिकारकही ठरू शकते. मॉर्निंग वॉक करण्याचा योग्य मार्ग कोणता आहे ते जाणून घेऊयात.

morning walk | sakal

पोट भरून खाऊ नका

जेव्हा तुम्ही मॉर्निंग वॉकसाठी जाता तेव्हा लक्षात ठेवा की काहीही जड पदार्थाचे सेवन करू नका. यामुळे पचनाच्या समस्या उद्भवू शकतात.

morning walk | sakal

आहार

सकाळी लवकर काही खायचे असेल तर हलका आणि पौष्टिक आहार घ्या. फळे, दही यांसारख्या पदार्थांचे सेवन करणे फायदेशीर आहे. यामुळे ऊर्जा मिळते आणि आरोग्य चांगले राहते.

morning walk | sakal

पाणी पिण्यास विसरू नका

मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडल्यावर पाणी पिऊन बाहेर जा. त्यामुळे चालताना शरीरातील हायड्रेशन टिकून राहण्यास मदत होईल. सकाळी चालण्याआधी पाणी प्यायल्याने एनर्जी लेव्हल वाढते आणि शरीर सक्रिय राहते. 

morning walk | sakal

योग्य शूज निवडा

मॉर्निंग वॉक करताना तुमचे शूज योग्य असावेत. आरामदायक आणि फिटिंग वॉकिंग शूज निवडणे चांगले आहे. चालण्याचे शूज जेवढे आरामदायक आणि फिट असतील तेवढेच ते आरोग्यासाठी चांगले आहेत. नेहमी चांगले ग्रीप असलेले शूज निवडा.

morning walk | sakal

वॉर्म अप करण्यास विसरू नका

मॉर्निंग वॉक करण्यापूर्वी वॉर्म अप सर्वात महत्त्वाचे मानले जाते. यामुळे शरीर चालण्यासाठी तयार होते आणि स्नायू व्यवस्थित काम करू लागतात. वैद्यकशास्त्रानुसार, चालण्याआधी 5-10 मिनिटे वॉर्म अप आवश्यक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

morning walk | sakal