कार्तिक पुजारी
ऑपरेशन ब्लूस्टारला आज ४० वर्ष होत आहेत.
या पार्श्वभूमीवर पंजाबच्या अमृतसरमधील सुवर्ण मंदिरात काही शीख समूहायाच्या लोकांनी खलिस्तान समर्थनात घोषणा दिल्याची माहिती आहे.
भिंडरावाले हा शीख समूदायाच्या कट्टर संघटनेचा प्रमुख होता. वेगळ्या पंजाबची त्यांची मागणी होती. सुवर्ण मंदिरामध्ये भिंडरावाले आणि त्याचे समर्थक लपून बसले होते.
त्यावेळी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या आदेशाने १९८४ मध्ये ऑपरेशन ब्लू-स्टार राबवण्यात आले होते.
यात भारतीय लष्कराने सुवर्ण मंदिरात घुसून भिंडरावाले आणि त्याच्या समर्थकांचा खात्मा केला होता. या सर्व घटनेमुळे पंजाबमध्ये संतापाची लाट पसरली होती.
इंदिरा गांधी यांना त्यांच्याच दोन शीख सुरक्षारक्षकांनी गोळ्या घालून संपवलं होतं.
३१ ऑक्टोबर १९८४ मध्ये इंदिरा गांधी यांच्या निवासस्थानी ही घटना घडली होती. त्यानंतर देशभरात दंगली देखील उसळल्या होत्या