Sandip Kapde
छत्रपती शिवाजी महाराज प्रत्येकासाठी प्रेरणा आहेत.
त्यांनी अनेक मोठे पराक्रम केले, त्यांचे आरोग्य देखील उत्तम होते.
छत्रपती शिवाजी महाराजांचा आहार कसा होता? हा प्रश्न आणि त्यावरही अनेक मतमतांतरे झाली.
याविषयीचं नेमकं चित्र स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला गेला, अनेक लेखकांनी यावर लिहलं आहे.
आहार आणि युद्ध यांच्यातील थेट संबंध छत्रपती शिवाजी महाराजांनी ओळखले होते.
लढाई करायच्या आहेत तर त्यावेळी आहार देखील महत्वाचा आहे.
सैन्याच्या आहारासमवेत ते स्वत:च्य़ा आहाराविषयीसुद्धा अतिशय काटेकोर आणि शिस्तप्रिय होते.
महाराजांच्या आहारामध्ये ज्वारी, बाजरी, नाचणीची भाकरी, दूध, लोणी दही तूपाचा वापर होत होता.
मोहिमेवर असतांना केळी देखील मोठ्या प्रमाणात सोबत असायच्या
सैन्यासाठीही या गोष्टींचा वापर त्या काळात केला जात असेल.
इतिहासकार इंग्रजीत सावंत यांनीही महाराजांच्या आहाराविषयी काही गोष्टी स्पष्ट केल्या होत्या
शिवाजी महाराज आग्रा येथे औरंगजेबाच्या कैदेत सापडले तेव्हा ते तिथं सुकामेवा खात होते आणि एक वेळ जेवत होते
इतिहासकार म्हणतात की छत्रपती शिवाजी महाराजांचा मासांहाराला विरोध नव्हता, याचे अनेक उदाहरण देखील आहेत.
शिवाजी महाराजांचा मांसाहाराला विरोध नव्हता याचं उत्तम उदाहरण सावंत यांनी दिलं आहे.
मात्र शिवाजी महाराजांच्या आहारात मांसाहार होते की नाही याची लेखी नोंद कुठेही आढळत नाही