Saisimran Ghashi
छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राच्या इतिहासातील आराध्य दैवत आहेत, ज्यांनी जनतेस स्वाभिमान आणि स्वातंत्र्याचे महत्त्व शिकवले.
स्वराज्यासाठी लढणाऱ्या या रयतेच्या राजाच्या यशाचे काही रहस्य आहेत.
छत्रपती शिवाजी महाराजांनी धाडसाने आणि आत्मविश्वासाने सैन्याचे नेतृत्व केले.
शत्रूला गोंधळात टाकण्यासाठी गनिमी कावा या युद्धनीतीचा उपयोग केला.
समाजातील सर्व घटकांना सोबत घेतले, ज्यामुळे जनतेचा पाठिंबा मिळाला.
महिलांच्या सुरक्षेसाठी कठोर नियम बनवले आणि त्यांचे संरक्षण केले.
किल्ल्यांची रचना अत्यंत योजनाबद्ध केली, ज्यामुळे संरक्षण बळकट झाले.
सर्व धर्म आणि संस्कृतींना मान देऊन सामाजिक सलोखा जपला.