डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे लोकशाहीबाबतचे विचार काय होते?

Amit Ujagare (अमित उजागरे)

खरी लोकशाही म्हणजे काय व ती टिकवण्यासाठी कुठल्या गोष्टी आवश्यक आहेत? या विषयावर घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपले विचार व्यक्त केले आहेत.

Dr. Ambedkar Original Photos

पुण्यातील 'पूना डिस्ट्रिक्ट लॉ लायब्ररी'च्या हॉलमध्ये २२ डिसेंबर १९५२ रोजी पार पडलेल्या विशेष कार्यक्रमात बाबासाहेबांनी आपले विचार मांडले.

Dr. Ambedkar Original Photos

इंग्रजीतून बाबासाहेबांनी आपलं भाषण केलं होतं, त्यांचे विचार ऐकण्यासाठी हा हॉल खच्चून भरला होता. खैरमोडे लिखित डॉ. भीमराव रामजी आंबेडकर चरित्र खंड अकरामध्ये याचे संदर्भ देण्यात आले आहेत.

Dr. Ambedkar Original Photos

बाबासाहेब म्हणतात, "लोकशाही हे राज्यकारभाराचं असं रुप आहे जे कधीही स्थिर नसतं तर ते बदलत जातं.

Dr. Ambedkar Original Photos

लोकशाहीचं स्वरुप एकाच देशात कायम नसतं. इंग्लंडमध्ये १६८८ला जे लोकशाहीचं स्वरुप होतं ते १६८८ नंतर राहिलं नाही. १८३२ मध्ये लोकशाही व्यवस्थेत अनेक राजकीय सुधारणा झाल्या.

Dr. Ambedkar Original Photos

लोकशाहीचं ध्येय हे कालमानानुसार बदलत असतं. पूर्वी राजसत्ता आबाधित होती तिला आळा घालण्यासाठी लोकशाही अस्तित्वात आली.

Dr. Ambedkar Original Photos

राजेशाहीला लोकमताचा लगाम घालणं ऐवढंच आधी लोकशाहीचं ध्येय होतं, पण आता लोकांचं जास्तीत जास्त हितं साधणं हे ध्येय आहे.

Dr. Ambedkar Original Photos

रक्ताचा एकही थेंब वाया न जाता लोकांच्या राजकीय आणि सामाजिक जीवनात क्रांतीकारक बदल घडवून आणणे म्हणजे लोकशाही होय, अशी व्याख्या स्वतः डॉ. आंबेडकर यांनी केली आहे.

Dr. Ambedkar Original Photos

लोकशाही यशस्वी होण्यासाठी समाजात श्रेष्ठ-कनिष्ठ असा भेद असता कामा नये. सर्व समाज समतेच्या पातळीवर उभा असायला हवा.

Dr. Ambedkar Original Photos

ज्या देशांतील समाज विषमतेनं पोखरले गेले त्या देशात लोकशाही टिकू शकली नाही, असंही आंबेडकर यांनी म्हटलं होतं.

Dr. Ambedkar Original Photos

सक्षम विरोधी पक्ष, कायद्यापुढं आणि राज्यकारभारात सर्व समान, संसदीय नितीमत्ता आणि सारासार विचार यांचं काटेकोर पालन, बहुसंख्यकांनी अल्पसंख्यकांना सन्मानानं वागवणं असे इतर मुद्देही बाबासाहेबांनी आपल्या भाषणात मांडले.

Dr. Ambedkar Original Photos