Sandip Kapde
निराजीच्या भेटीत नारायण शेणवी यास शिवाजी महाराजांच्या होऊ घातलेल्या राज्याभिषेकासंबंधीची बातमी समजली.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळी इंग्रजांनी मुंबईहून विशेष भेटवस्तू पाठवल्या होत्या.
नारायण शेणवी इंग्रजांचा निरोप घेऊन निराजी पंडीताला भेटायला पाचाडला आला होता.
एप्रिल १६४४ च्या पहिल्या आठवड्यात निराजी पंडीतकडून नारायण शेणवीला शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाची बातमी कळली.
या बातमीची माहिती नारायण शेणवीने मुंबईच्या काउन्सिलला दिली.
इंग्रज काउन्सिलने राज्याभिषेकाच्या समारंभाला नजराणा घेऊन उपस्थित राहण्याचा निर्णय घेतला.
हेन्री ऑविडांडेन यांची राज्याभिषेकाच्या समारंभात इंग्रजांच्या वतीने उपस्थित राहण्यासाठी नेमणूक करण्यात आली.
नजराण्याची किंमत साधारणपणे १००० ते १२०० रुपयांपर्यंत ठरवण्यात आली होती.
इंग्रजांनी शिवाजी महाराजांना हिरेपाडीत शिरपेच दिली ज्याची किंमत ६९० रुपये होती.
शिवरायांना हिरेजडीत सळकटी भेट दिली, ज्याची किंमत ४५० रुपये होती.
मोतीही भेटवस्तू म्हणून दिले गेले, ज्याची किंमत ५१० रुपये होती.
संभाजी महाराजांसाठी दोन लाल खचित सळकटी पाठवली ज्याची किंमत १२५ रुपये होती
तसेच एक कंठी देण्यात आली होती ज्याची किंमत २५० रुपये होती
या भेटी शिवाजी महाराजांच्या अधिकार्यांना देखील दिल्या गेल्या.
मोरोपंत पंडीत, अण्णाजी पंडीत, निराजी पंडीत आणि शिवाजी महाराजांचे कारभारी यांनाही नजराणे दिले गेले.
इंग्रजांनी छत्रपती शिवाजी महाराजांशी तह करण्याचे प्रस्ताव पाठविले होते.
तहामध्ये इंग्रजांनी व्यापार आणि रहिवास याबाबत स्वातंत्र्य मिळवण्याचे कलम होते.
उभयतांमध्ये आजपासून पक्क्या व अभंग सलोख्याचा तह असावा
सर्व शत्रुत्व नष्ट व्हावे आणि उभयपक्षी कोणत्याही मानात लूट करणे, छापे घालणे इत्यादी प्रकारे नुकसान करू नये