Anuradha Vipat
धनंजय पोवार आणि अंकिता वालावलकर चांगले मित्र झाले आहेत .
संपूर्ण सीझन ते एकमेकांबरोबर असल्याचे पाहायला मिळाले.
ते दोघं एकमेकांना भाऊ-बहीण मानत असल्याचे दिसले होते.
आता एका मुलाखतीत अंकिताच्या लग्नात आहेर काय देणार यावर धनंजय पोवारने वक्तव्य केले आहे.
धनंजय पोवार म्हणाला की , आहेर काय द्यायचा, ती दिसते तशी नाही. जरा आगाऊ आहे. मला ती पाट मागेल, सोफा मागेल, साडी देऊन काय सात-आठ हजारांत भागवण्यासारखं मला वाटत नाही.
पुढे धनंजय पोवार म्हणाला की , पण मी भाऊ म्हणून लग्नात हजर राहणार आहे तेव्हा ११०० रुपयांचं पाकीट वगैरे देईन
बिग बॉस मराठी ५’नंतर यामध्ये सहभागी झालेले स्पर्धक विविध कारणांमुळे सातत्याने चर्चेत आहेत.