सकाळ डिजिटल टीम
निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी आपण दररोज 15 मिनिटे धावले पाहिजे. धावल्याने संपूर्ण शरीराला फायदा होतो. जाणून घ्या रोज 15 मिनिटे धावण्याचे फायदे..
दररोज 15 मिनिटे धावल्याने तुमचे सांधे मजबूत होतात. यामुळे सांधेदुखी आणि सूज कमी होते. सांधेदुखीच्या रुग्णांनी धावणे टाळावे.
पचनसंस्था निरोगी ठेवण्यासाठी रोज सकाळ-संध्याकाळी 15 मिनिटे धावले पाहिजे. यामुळे बद्धकोष्ठता, अपचन अशा अनेक समस्या दूर होतात.
तुमचे वाढलेले वजन कमी करण्यासाठी दररोज 15 मिनिटे धावणे सुरू करा. यामुळे शरीरात साठलेली चरबी वितळण्यास सुरुवात होईल.
शरीराचे स्नायू मजबूत करण्यासाठी धावणे फायदेशीर ठरू शकते. यामुळे शरीराच्या दुखण्यापासूनही आराम मिळतो. त्यामुळे फ्रॅक्चरचा धोका कमी होतो.
तुमचे हृदय निरोगी ठेवण्यासाठी आणि खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी दररोज 15 मिनिटे धावा. दररोज सकाळी आणि संध्याकाळी धावणे सुरू करा.
दररोज 15 मिनिटे धावल्याने तुमचा ताण कमी होऊ शकतो. वास्तविक, धावणे तुमचा मूड सुधारते आणि तुम्हाला फ्रेश वाटते.