साक्षी राऊत
स्वत:ला फिट ठेवण्यासाठी अनेक लोक योगासने आणि बरंच काही करत असतात. शरीरावरील एक्स्ट्रा चरबी घटवण्यासाठी काही लोक जिमसुद्धा लावतात. आज आपण फिट राहण्यासाठीच्या काही आसन एक्सरसाइज बघुयात.
फिट राहण्यासाठी एक्सरसाइज करणे फार महत्वाचे आहे. अशात एरोबिक्सपेक्षा सोपी कुठलीच एक्सरसाइज असू शकत नाही. ही एक्सरसाइज कुठल्याही वयाचे लोक करू शकतात.
वॉकिंग आरोग्यासाठी फार फायदेशीर असते. तेव्हा प्रत्येक वयाच्या व्यक्तींनी ब्रिस्क वॉक आवर्जून करावे. हृदयाच्या आरोग्यासाठी ब्रिस्क वॉक फार फायदेशीर असते. यामुळे वेटलॉस करण्यासही मदत होते.
दिवाळीपूर्वीच अनेकांनी ही एक्सरसाइज करायला सुरुवात करावी. सकाळी उठून ब्रिदींग एक्सरसाइज केल्याने फुफ्फुसांचे आरोग्य चांगले राहते. याशिवाय ब्रिदिंग एक्सरसाइज केल्याने ब्लड सर्क्युलेशन सुरळीत राहते.
रोज जॉगिंग केल्यास वजन कमी होण्यास मदत होईल. जॉगिंग हृदयाच्या आरोग्यासाठी, इन्युनिटी वाढवण्यासाठी आणि इंसुलिन वाढवण्यासाठी तसेच डिप्रेशनमधून बाहेर येण्यास फायदेशीर ठरते.
स्क्वॉट्स आरोग्यासाठी फार गरजेचे आहे. त्याने मसल्स अॅक्टिव्ह राहतात. शिवाय हाडेही मजबूत राहण्यास मदत होते.
स्ट्रेचिंग केल्याने मसल्स चांगले राहतात. या एक्सरसाइजच्या मदतीने बॉडी पेन कमी होते. शिवाय स्टॅमिनाही वाढतो.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.