सकाळ डिजिटल टीम
WhatsApp आपल्या यूजर्संचा एक्सपीरियन्स सातत्याने वाढवण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असते. कंपनी नेहमी नवीन नवीन फीचर रोलआउट करीत असते.
WhatsApp एकाचवेळी ६ नवीन फीचर्स रोलआउट केले आहेत. जाणून घ्या या नवीन फीचर्सचा काय फायदा होणार आहे.
आउट ऑफ चॅट प्लेबॅक याच्या मदतीने यूजर व्हाइस मेसेजच्या चॅटबाहेर ऐकू शकतील. याचा सर्वात मोठा फायदा हा आहे की, यूजर व्हाइस मेसेज ऐकत फोनमध्ये मल्टि टास्किंग सोबत दुसऱ्या मेसेजला रिप्लाय सुद्धा करू शकेल
पॉज किंवा रिज्यूम करा रेकॉर्डिंग या फीचरच्या मदतीने यूजर्स व्हाइस मेसेजला रेकॉर्ड करताना त्याला थांबवून त्याच जागे पासून कंटिन्यू करू शकतो.
वेवफॉर्म व्हिज्युअलायजेशन आणि ड्राफ्ट प्रीव्ह्यूवेवफॉर्म यामुळे यूजर्संना रेकॉर्डिंग मध्ये खूपच मदत मिळेल. याचप्रमाणे ड्राफ्ट प्रीव्ह्यू यूजर्सला व्हाइस नोट पाठवताना त्याला ऐकण्याची संधी मिळेल.
रिमेंबर प्लेबॅक आणि फास्ट प्लेबॅक ऑन फॉरवर्ड मेसेज हे फीचर आल्याने यूजर व्हाइस मेसेज ऐकताना पॉज करू शकता. किंवा त्याला पुन्हा त्याच जागेपासून सुरू करू शकता.
शांतपणे ग्रुपमधून बाहेर पडता येणार व्हॉट्सअॅप वापरकर्त्यास ग्रुपमधील प्रत्येकास कळू न देता बाहेर पडता येऊ शकेल. वापरकर्ता बाहेर पडला हे केवळ ग्रुपच्या अॅडमीनला कळेल. याच महिन्यात हे फिचर जारी होईल.
ऑनलाइनवर नियंत्रण या फिचरनुसार, आपण ऑनलाइन आहोत हे कोणाला पाहू द्यायचे हे वापरकर्त्यास ठरविता येईल. हे फिचरही याच महिन्यात येत आहे.
मेससेचा स्क्रनशॉट घेण्यापासून रोखण्यासाठी आहे. 'व्ह्यू वन्स' या नावाचे हे फिचर सध्या हे चाचणी प्रक्रियेत आहे. ते लवकरच जारी होईल.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.