सकाळ डिजिटल टीम
महाराष्ट्रातील इरसाल व्यक्तिमत्व दादा कोंडके आणि गायिका आशा भोसले हे एकेकाळी लग्न करणार होते हे तुम्हाला माहितीये का ?
दादांनी त्यांचं आत्मचरित्र एकटा जीवमध्ये ही गोष्ट सांगितली आहे.
विच्छा नाटकाच्या निमित्ताने आशा भोसले आणि दादांची ओळख झाली. पुढे दादा सिनेमात काम करू लागले आणि आशा भोसलेंबरोबरची त्यांची मैत्री वाढली.
आशा यांना दादा आवडू लागले आणि दादांनाही आशाबाई आवडायच्या. नंतर दादांना आशाबाईंनी लग्नाची मागणी घातली. तेव्हा दादा त्यांचे गुरु भालजी पेंढारकर यांना विचारतो म्हणाले.
दादा आणि आशाबाई भालजी पेंढारकरांना भेटायला कोल्हापूरला गेले आणि आशाबाईंनी त्यांचा लग्नाचा निर्णय भालजींना सांगितला. तेव्हा आशाबाई गेल्यावर भालजी यांनी दादांना सल्ला दिला.
भालजी म्हणजे तुम्ही जर आशा यांच्याशी लग्न केलं तर तुला स्वतंत्र काही करता येणार नाही. लग्नाला होकार देऊ नकोस असं सांगितलं. दादांनी त्यांचा सल्ला मानला आणि लग्नाला नकार दिला. पुढे आशा यांनी आर डी बर्मन यांच्याशी संसार थाटला.