कार्तिक पुजारी
१९९९ मध्ये एप्रिल महिन्यापर्यंत देशात राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार होते.
दुसर्यांदा पंतप्रधान झालेले अटल बिहारी वाजपेयी यांचे सरकार येऊन फक्त १३ महिने झाले होते. त्यानंतर एनडीए सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्यात आला होता.
लोकसभेत मतदान झालं आणि फक्त १ मताने वाजपेयी यांचे सरकार पडले होते.सरकार पडण्याचं सर्व खापर गिरिधर गमांग यांच्यावर पडलं होतं
१९९८ मध्ये ममांग काँग्रेसच्या तिकीटावर खासदार झाले होते. पण, १९९९ मध्ये ओडिशाच्या विधानसभेत विजय झाल्यानंतर त्यांना काँग्रेसने मुख्यमंत्री बनवलं.
नियमानुसार त्यांनी लोकसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा द्यायला हवा होता. पण, त्यांनी तसं केलं नाही.
टीडीपीचे तत्कालीन लोकसभा अध्यक्ष बालयोगी यांनी गमांग यांनी मत द्यावं की देऊ नये हे त्यांच्या विवेक बुद्धीवर सोडलं होतं.
बालयोगी यांनी गमांग यांना मतदानाचा अधिकार दिला नसता तर चित्र वेगळं असतं. त्यामुळेच टीडीपीला पुन्हा लोकसभा अध्यक्षपद देण्यास भाजप तयार नाही.