सकाळ डिजिटल टीम
बॉलिवूडमधील एकेकाळच्या आघाडीच्या अभिनेत्री म्हणजे ट्रॅजेडी क्वीन या नावाने ओळखल्या जाणाऱ्या मीना कुमारी. हावभाव आणि दमदार अभिनय यामुळे मीनाकुमारी कायमच प्रेक्षकांच्या लाडक्या राहिल्या.
बालकलाकार म्हणून अभिनय क्षेत्रात कारकीर्द सुरु करणाऱ्या मीना कुमारी यांना 'बैजू बावरा' या सिनेमामुळे खरी प्रसिद्धी मिळाली.
या सिनेमात त्यांनी साकारलेली गौरीची भूमिका अनेकांना आवडली. बैजूसाठी स्वतःच्या जीवाचा त्याग करायला तयार झालेली गौरी मीनाकुमारी यांनी उत्तम साकारली.
या सिनेमात मीनाकुमारी यांच्या बरोब्बर भारत भूषण यांनी काम केलं होतं.
एका सीनच्या शूटिंगवेळी भारत यांनी मीना कुमारींचा जीव वाचवला. हा सीन नदीकिनारी शूट होत होता.
मीना कुमारी यांना नावेत बसून भावूक होऊन रडायचं होतं. रडताना त्यांनी डोळे झाकून घेतले आणि त्याचवेळी त्यांची नाव धबधबयाच्या दिशेने वाहू लागली. हे भारत भूषण यांनी पाहिलं आणि त्यांनी पाण्यात उडी मारून मीना कुमारींची नाव रोखली आणि त्यांचा जीव वाचवला.
हा किस्सा मीनाकुमारी एक गूढ या पुस्तकात सांगण्यात आला आहे. या पुस्तकाचे लेखक महेंद्र अवोडे हे आहेत.