अभिनेत्री म्हणून करिअर करायला धर्मेंद्र यांनी केला होता ईशाला विरोध

सकाळ डिजिटल टीम

धर्मेंद्र देओल

बॉलिवूडमधील 'हिमॅन' म्हणून धर्मेंद्र देओल यांनी ओळख कमावली. त्यांची पहिली पत्नी प्रकाश कौर जिवंत असताना त्यांनी अभिनेत्री हेमामालिनीशी दुसरं लग्न केलं.

ईशा आणि आहना

हेमामालिनी आणि त्यांना ईशा आणि आहना या दोन मुली झाल्या. पण या दोघीही देओल कुटूंबापासून कायम दूरच राहिल्या. हेमामालिनी यांनी एकटीने त्यांचा सांभाळ केला तर धर्मेंद्र कधीतरी येऊन त्यांना भेटायचे.

ईशाने निवडली अभिनयाची वाट

ईशाने अभिनयक्षेत्रात पदार्पण करायचं ठरवलं पण धर्मेंद्र यांचा या गोष्टीला खूप विरोध होता.

ईशाने सांगितली आठवण

एका मुलाखतीत ईशाने ही गोष्ट शेअर केली. ती म्हणाली कि, "जेव्हा तिने अभिनयक्षेत्रात प्रवेश केला तेव्हा ती एका वेळी दोन सिनेमांचं शूटिंग करत होती. "

धर्मेंद्र यांचा विरोध

पुढे ती म्हणाली,"कि माझे वडील माझ्यासाठी आणि माझ्या बहिणीसाठी खूप पझेसिव्ह आहेत आणि आम्ही कायम पडद्याआड राहावं, दुसरं क्षेत्र निवडावं असं त्यांना वाटायचं त्यामुळे त्यांना मी अभिनयक्षेत्रात काम करावं म्हणून मनवण खूप कठीण गेलं. "

गाजलेले सिनेमे

ईशाचे धूम, एलओसी कारगिल, काल हे सिनेमे गाजले.

भरत तख्तानीशी लग्न आणि करिअर रामराम

ईशाने बिझनेसमन भरत तख्तानीशी लग्नगाठ बांधली आणि बॉलिवूडमधील करिअरला रामराम केला. दोन

घटस्फोट

ईशाचा नुकताच घटस्फोट झाला असून तिला दोन मुली आहेत.

येथे क्लिक करा