kimaya narayan
भारतीय सिनेविश्वातील पहिला सुपरस्टार म्हणजे राजेश खन्ना. आजही त्यांचे अनेक सिनेमे सुप्रसिद्ध आहेत.
हृषीकेश मुखर्जी यांनी दिग्दर्शित केलेला आनंद हा गाजलेला सिनेमा. यातील राजेश खन्ना यांनी साकारलेली भूमिका मुख्य भूमिका सगळ्यांनाच आवडली.
अमिताभ बच्चन यांनीही या सिनेमात काम केलं होतं तर रमेश देव आणि सीमा देव यांच्याही या सिनेमात मुख्य भूमिका होत्या.
सतत हसतमुख असलेल्या आनंदचा कॅन्सर झाल्यावर आयुष्याकडे बघण्याचा सुंदर दृष्टिकोन या सिनेमात दाखवण्यात आला होता.
या सिनेमाच्या शूटिंगच्या पहिल्याच दिवशी राजेश खन्ना त्यांच्या नेहमीच्या सवयीप्रमाणे उशिरा आले. यामुळे दिग्दर्शक हृषीकेश मुखर्जी खूप चिडले होते. राजेश खन्ना येताच ते चिडून पॅकअप म्हणाले आणि तिथून निघून गेले.
या घटनेनंतर राजेश यांनी सेटवर वेळेत यायला सुरुवात केली. सीमा देव यांनी त्याचं आत्मचरित्र असलेल्या 'सुवासिनी' या सिनेमात हा किस्सा सांगितला आहे.