Saisimran Ghashi
सूर्यग्रहण तेव्हा लागते जेव्हा चंद्र पृथ्वी आणि सूर्याच्या मध्ये येतो आणि सूर्याची किरणे काही वेळासाठी पृथ्वीपर्यंत पोहोचण्यापासून रोखतो.
यावर्षीचे पहिले सूर्यग्रहण 8 एप्रिलला झाले.
नासाच्या अनुसार 2024 वर्षातील दुसरे सूर्यग्रहण 2 ऑक्टोबर रोजी होणार आहे.
भारतीय वेळेनुसार 2 ऑक्टोबर रोजी रात्री 9 वाजून 13 मिनिटांनी हे सूर्यग्रहण सुरू होईल.
हे सूर्यग्रहण मध्ये रात्री 3 वाजून 17 मिनिटांपर्यंत असेल .एकूण कालावधी सुमारे सहा तासांचा असेल.
ज्यावेळी हे सूर्यग्रहण होईल तेव्हा भारतात रात्र असेल त्यामुळे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही.
2024 सालचे दुसरे सूर्यग्रहण अत्यंत दुर्मिळ मानले जाते यावेळी सूर्य कंकणाकृती असेल.
सूर्यग्रहण ही खगोलीय घटना आहे जिथे शास्त्रज्ञांसोबतच सर्वसामान्यांनाही प्रतीक्षा आहे