गोविंदाने गिफ्ट केलेल्या शर्टाचा राजकुमार यांनी केला हातरुमाल

सकाळ डिजिटल टीम

अभिनेता गोविंदा नव्वदीच्या दशकातील त्याच्या भन्नाट सिनेमांसाठी प्रसिद्ध आहे. गोविंदाचे सिनेमे आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे.

खूप स्ट्रगल करत गोविंदाने स्वतःची ओळख निर्माण केली. सुरुवातीच्या काळात अनेक सिनेमांमध्ये गोविंदाने केलेले सिनेमे खूप जास्त हिट ठरले. कॉमेडी अभिनेता म्हणून ओळख निर्माण करण्या आधी अक्शन हिरो म्हणून ओळख बनली होती.

ऐंशीच्या दशकात आलेल्या जंगबाज या सिनेमात राजकुमार यांनी गोविंदा बरोबर काम केलं होत. यावेळी गोविंदाने घातलेला एक शर्ट त्यांना खूप आवडला.

राजकुमार यांनी ही गोष्ट गोविंदाला सांगितली. त्याने ताबडतोब तो शर्ट त्यांना गिफ्ट केला. पण राजकुमार यांनी तो शर्ट वापरला नाही.

उलट त्यांनी या शर्टचा हातरुमाल बनवला आणि बरेच दिवस तो हातरुमाल तो खिशात सगळ्यांना दिसेल असा ठेवून ते वावरायचे.

या घटनेचा गोविंदा वर काय परिणाम झाला हे माहित नसलं तरीही त्यानंतर त्यांनी एकत्र कोणत्याही सिनेमात काम केलं नाही.

त्यानंतर गोविंदाने स्वतःची बॉलिवूडमध्ये स्वतंत्र ओळख बनवली.

रितेशच्या घरातील बिग बॉस कोण ? - येथे क्लिक करा