kimaya narayan
बॉलिवूडमधील एक आघाडीचा गायक शान उर्फ शांतनू मुखर्जी. अनेक वेगवेगळ्या गाण्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या शानने स्वतःची ओळख प्रेक्षकांमध्ये कमी कालावधीत बनवली.
नुकत्याच एका मुलाखतीत शानने भुताच्या भीतीने त्याने एका टेकमध्ये गाणं गायल्याच्या किस्सा शेअर केला.
शानने विशाल-शेखर या संगीतकारांकडे एक गाणं गायलं. त्या तिघांचं एकमेकांबरोबर पहिलं काम होतं.
विशाल यांनी शान यांच्यावर प्रॅन्क करायचा ठरवलं. विशाल यांनी रेन्टवर घेतलेला रेकॉर्डिंग स्टुडिओ सातरस्त्याला होता आणि तिथे एक कब्रस्तान होतं.
त्यांनी शानला रेकॉर्डिंगसाठी पाच वाजता बोलावलं. जसं तो स्टुडिओमध्ये पोहोचला तसं विशाल आणि शेखर यांनी शानला सांगितलं कि त्याला लवकरात लवकर रेकॉर्डिंग संपवावं लागेल. कारण सात नंतर इथे काहीतरी वाईट घटना घडतात.
भुतांच्या भीतीने शान यांनी लगेच गाण्याचं रेकॉर्डिंग संपवलं. त्यानंतर ते याविषयी विसरूनही गेले.
त्यानंतर शानने जेव्हा बऱ्याच काळाने स्वतःचं गाणं ऐकलं तेव्हा त्याला जाणवलं कि भुताच्या नादात त्यांनी खूप उत्तम गाणं कमी वेळात रेकॉर्ड केलं.