सकाळ डिजिटल टीम
भाताने लठ्ठपणा येतो, असा सर्वांचा समज असल्याने अनेकदा भात नेमका केव्हा खावा, असा प्रश्न प्रत्येकाला पडतो.
आज आम्ही तुम्हाला भात केव्हा खायचा, हे सांगणार आहोत.
भात आपल्या शरिरासाठी उत्तम आहे. त्यातील कार्बोहायड्रेट आपल्याला ऊर्जा देतात.
रात्री भात खाणे शरीरासाठी खुप फायदेशीर आहे. रात्री डाळ-भात खाल्ल्याने आपले हृदय आणि ब्लडशुगर नॉर्मल राहते.
याशिवाय रात्री भात खाल्ल्याने आपले आतडेही मजबूत राहतात.
तांदूळ पचायला जड नसतो रात्री भात खाल्ल्याने झोपही उत्तम होते.
जर तुमचं वजन जास्त असेल किंवा तुम्ही लठ्ठ असाल तर तुम्ही दुपारी भाताचे सेवन करू शकता.
याशिवाय रात्री उरलेला भात तुम्ही सकाळी कांद्याची फोडणी देऊनही खाऊ शकता.
भात तुम्ही सकाळी नाश्त्याला, दुपारी किंवा रात्री जेवणात बिनधास्तपणे खाऊ शकता. फक्त आपण जे खातो त्याचं पचन व्यवस्थित होतं का, याकडे लक्ष द्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.