सकाळ डिजिटल टीम
मराठी इंडस्ट्रीतील दमदार विनोदी अभिनेते आणि सिनेनिर्माते म्हणजे दादा कोंडके.
मराठी सिनेमाच्या नावावर सिल्व्हर ज्युबली आणि गोल्डन ज्युबलीचा विक्रम करणाऱ्या दादांचे सिनेमे आजही अनेक प्रेक्षक आवर्जून बघतात.
पण तुम्हाला माहितीये का ? दादा त्यांचा कोणताही सिनेमा एडिट झाल्यावर सिनेमाची ट्रायल ते कायम बॉम्बे लॅबच्या कामगारांना दाखवायचे.
दादांचा पांडू हवालदार हा सिनेमा खूप गाजला. दादांबरोबर अशोक सराफ यांचीही या सिनेमात मुख्य भूमिका होती.
फक्त २९ दिवसांत या सिनेमाचं शूटिंग पूर्ण झालं त्यामुळे सिनेमात काहीतरी कमी आहे अशी शंका दादांना होती. त्यामुळे त्यांनी या सिनेमाची ट्रायल बॉम्बे लॅबमध्ये ठेवली.
ट्रायल झाल्यावर सिनेमातील चूक तिथे उपस्थित असलेल्या चहावाल्या मुलाने दादांना सांगितली.
त्याने सांगितलं कि,"सिनेमात तुमच्या घरात जी मुकी मुलगी राहतेय ती खूप मोठ्या साहेबाची मुलगी असल्याचं दाखवलंय. मग तुमच्या पोलीस कॅम्पमधील एकाही पोलिसाने तिला कसं ओळखलं नाही. कॅम्पमधील कोणी ना कोणी त्यांच्या घरी पहाऱ्याला गेलं असेलच ना ?"
दादांच्या ही चूक लक्षात आली त्यांनी पुन्हा सिनेमाचं शूटिंग ठेवत त्या मुलीचा डोक्यावर पदर घेऊन जातानाचा सीन शूट केला आणि ती चूक सुधारली. एका कामगाराने आपल्याला ही चूक दाखवून दिली याचा दादांना अजिबात कमीपणा वाटला नाही.