Sudesh
उन्हाळ्यामध्ये घराला थंड ठेवण्यासाठी पंखा उपयोगी असतो. कूलर-एसी आले असले, तरी प्रत्येक घरामध्ये पंखा असतोच.
तुमच्या घरातील पंखा जर अपेक्षेप्रमाणे थंड हवा देत नसेल, तर तो कसा बसवला आहे हे तपासणं गरजेचं आहे.
तुमचा फॅन किती उंचीवर आहे यावर त्याची हवा किती थंड आणि वेगाने असेल हे ठरतं.
फॅन ठराविक उंचीवर असल्यामुळे केवळ हवा चांगली मिळत नाही, तर सुरक्षितता देखील वाढते.
अमेरिकन लायटिंग सोसायटीनुसार, चांगल्या हवेसाठी पंखा फरशीपासून सुमारे 8 ते 9 फूट उंच हवा.
पंख्यातून गार हवा येण्यासाठी तो छतापासून सुमारे 8 इंच खाली हवा, असंही तज्ज्ञांनी म्हटलं आहे.
छतापासून अगदी जवळ असणारा पंखा हा तुलनेने गरम हवा पसरवत असल्याचं समोर आलं आहे.
पंखा हा नेहमी खोलीच्या मधोमध लावायला हवा, जेणेकरुन सगळीकडे समान हवा पसरेल.