Sandip Kapde
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमध्ये 2023 च्या नौदल दिनानिमित्त उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं होतं.
हा पुतळा कोसळ्यामुळे राज्यासह देशभरात संतापाची लाट निर्माण झाली आहे.
अनेक ऐतिहासिक पुतळे अजून उभे असताना हा पुतळा कसा कोसळला?, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जगातील पहिल्या पुतळ्याची रंजक कहाणी तुम्हाला माहिती आहे का?
हातात तलवार घेऊन घोड्यावर स्वार असलेले शिवाजी महाराजांचे अनेक ठिकाणी पाहायला मिळतात
देशात आजही अनेक ठिकाणी हीच प्रतिमा साकारण्यात येते
मात्र तुम्हाला माहित आहे का देशातील हे पुतळे ज्या पुतळ्यावरुन उभारले गेले तो पहिला पुतळा कुठे आहे?
छत्रपती शाहू महाराजांच्या पुढाकाराने शिवाजी महाराजांचा जगातील पहिला पुतळा पुण्यातील ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटीमध्ये उभारण्यात आला
1917 साली हा पुतळा उभारण्याचा निर्णय झाला, तब्बल अकरा वर्षांच्या मेहनतीनंतर उभा राहिला
इंग्रज सरकारने देखील याला पाठिंबा दिला होता.
पहिल्या महायुद्धात मराठ्यांनी दाखवलेल्या पराक्रमाने इंग्रज देखील प्रभावित झाले होते
त्यामुळे इंग्रजांचा युवराज प्रिन्स एडवर्डने शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या भूमिपूजनाला यायचं आमंत्रण स्वीकारलं.
शिवाजी महाराजांचं महत्व इंग्रजांना मान्य करावं लागलं. इंग्रजांना कळालं की लढणाऱ्या या लोकांची मूळ प्रेरणा ही आहे. त्यातून स्मारकाची ही कल्पना पुढे आली.
अर्थात त्यामध्ये शाहू महाराज प्रमुख होते . 6 मे 1922 त्यांचे निधन झालं . त्यानंतर स्मारकाची जबाबदारी ग्वाल्हेरच्या अलीबहाद्दर महादेवराव शिंदेंकडे आली.
ग्वाल्हेरच्या अलिबहाद्दर माधवराव शिंदेंचं निधन झालं. त्यानंतर या स्मारकाची जबाबदारी कोल्हापूरचे तिसरे राजाराम महाराज यांच्यावर आली.
नानासाहेब करमरकर यांनी हा पुतळा बनवला, त्यांनी फक्त पुतळा बनवला नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्ण अभ्यास देखील केला.
माझगाव डॉकयार्ड मध्ये जहाजे तयार करणाऱ्या यंत्रणेचा उपयोग पुतळा उभारला
नानासाहेब करमरकर यांनी लागलीच या पुतळ्यासाठी मॉडेल बनवायला घेतलं .
पुणे स्टेशनपासून वाजत-गाजत या पुतळ्याची मिरवणूक काढण्यात आली
राजाराम महाराजांसोबत या पुतळ्याच्या अनावरणाला मुंबई प्रांताचा गव्हर्नर लेस्ली विल्सन हजर होता