Sandip Kapde
छत्रपती शिवाजी महाराजांनी बोट कापल्यानंतर शाहिस्तेखान कुठं पळाला, असा प्रश्न अनेकांना पडला असेल.
शाहिस्तेखान ३ वर्ष पुण्यात ठाण मांडून बसला होता, शिवाजी महाराजांनी त्याला धडा शिकवला तेव्हा तो ६४ वर्षाचा होता.
शाहिस्तेखान इथल्या जनतेची पिळवणूक करत होता.
त्याचा बंदोबस्त करायच्या उद्देशाने छत्रपती शिवाजी महाराजांनी ५ एप्रील रविवार, १६६३ च्या रात्री शाहीस्तेखानाच्या पुण्यातील निवासस्थानी अर्थात लाल महालावर आपल्या निवडक साथीदारासह हल्ला केला.
मराठ्यांच्या सैन्याने लाल महालात घूसून समोर येणाऱ्या प्रत्येक शुत्रुला गारद केले.
शिवाजी महाराजांचा एक वार शाहिस्तेखानाच्या हातावर बसला आणि त्याची तीन बोटे तुटली.
पण अंधाराचा फायदा घेत तो बाहेर निघाला. आपला जीव वाचवण्यासाठी शाहिस्तेखान लपून बसला.
संकट टाळल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याला स्वत:ची लाज वाटू लागली. मराठ्यांनी त्याचा मोठा अपमान केला होता.
त्यामुळे ३ वर्ष पुण्यातून व हलणारा शाहिस्तेखान ८ एप्रील १६६३ ला पुण्यातून निघाला आणि औरंगाबादला गेला. त्याने परत पुण्याला येण्याचं नाव घेतलं नाही.
मिर्झा अबू तालिब हे शाहिस्तेखानाचं मुळं नाव तर शाहिस्तेखान ही त्याची पदवी होती. शाहिस्तेखान औरंगजेबाचा मामा होता.
शिवाजी महाराजांनी बोचे छाटल्यानंतर औरंगजेब बादशाह भयंकर संतापला होता. कारण तो औरंगजेबाचा देखील अपमान होता.
औरंगजेबाने शाहिस्तेखानाची तडकाफडकी बदली बंगालचा सुभेदार म्हणून केली. १६६४ साली शाहिस्तेखान बंगालमध्ये ढाक्याचा सुभेदार म्हणून रुजू झाला. इथं त्याने आपली कर्तबगारी दाखवली.
आज अस्तित्वात असलेले ढाका शहर शाहिस्तेखान यानेच उभं केल आहे. त्याने अनेक इमारती बांधला, अन्नाची किंमत कमी केली.
शिवरायांनी शिकवलेला धडा त्याने आयुष्यभर लक्षात ठेवला. पुढे त्याने लोकांच्या भल्यासाठी कामे केली. नंतर तो दिल्लीत आला आणि १६९४ मध्ये त्याचं निधन झालं.