आशुतोष मसगौंडे
अलिकडील काही वर्षांमध्ये एसटी महामंडळाने आपल्या सेवेमध्ये मोठे बदल केले आहेत.
या बदलामुळे एसटीकडील प्रवशांमध्येही वाढ झालेली आहे.
दरम्यान काही वेळा प्रवाशांना एसटीमुळे होणाऱ्या गैरसोयीचा सामना करावा लागतो.
यामध्ये कंडक्टरकडून सुट्टे पैसे न मिळणे हा प्रवाशांसाठी सर्वात मोठी प्रश्न आहे.
असे असले तरी एसटी महामंडळाने प्रवाशांशी सुट्ट्या पैशांसाठी वाद घालणाऱ्या कंडक्टर्सवर कारवाईही करते.
जर कंडक्टरने एखाद्या प्रवाशाशी सुट्ट्या पैशांसाठी वाद घातला तर प्रवाशी जवळच्या आगारात याबाबत तक्रार करू शकतो.
प्रवाशाच्या तक्रारीनंतर कोणाची चुकी आहे हे तपासल्यानंतर दोषींवर कारवाई करण्यात येते.
दरम्यान एसटी महामंडळाच्या संकेतस्थळावर प्रवाशांशी संबंधित अनेक प्रश्नांची उत्तरे देण्यात आली आहेत.