Saisimran Ghashi
केसांची समस्या आजकाल सामान्य झाली आहे. प्रदूषण, तणाव आणि अयोग्य आहार यामुळे केस गळणे, कोरडेपणा आणि खाज सुटणे यासारख्या समस्या उद्भवतात.
या समस्यांवर उपाय म्हणून आयुर्वेदिक तेल एक उत्तम पर्याय आहे. आयुर्वेदिक तेल केसांना पोषण देतात, त्यांची वाढ उत्तेजित करतात आणि त्यांना मजबूत बनवतात.
मार्केटमधील केसांच्या तेलापेक्षा घरगुती आयुर्वेदिक तेलाने केस जास्त लवकर वाढतात आणि अधिक मजबूत बनतात.
खोबरेलतेल,भृंगराज,आंवळा,मेथी,करडा,मीठा,कढई,चाळणी हे आवश्यक साहित्य आहे.
सर्व साहित्य स्वच्छ धुवा आणि बारीक करून घ्या.कढई गरम करा आणि कढईत नारळ तेल गरम करा.
भृंगराज, आंवळा, मेथी आणि करडा हे सर्व मसाले एकत्र करून बारीक पूड करून घ्या.
गरम केलेल्या तेलात ही पूड टाका आणि मंद आचेवर 5-7 मिनिटे शिजवा आणि तेल थंड करा
तेल थंड झाल्यावर ते एका काचेच्या बाटलीत भरून ठेवा. हे तेल आठवड्यातून दोनदा केसांच्या मुळांवर चांगली मालिश करून लावा.
केस मजबुतीने वाढवते आणि केसांचा कोंडा दूर करून केसांना चमकदार बनवते.
ही फक्त सामान्य माहिती आहे. कोणत्याही नवीन उत्पादनाचा वापर करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.