सकाळ डिजिटल टीम
जर आपण कमी किमतीत सोने खरेदी करण्याबद्दल बोललो, तर सर्वात पहिलं नाव डोळ्यासमोर येतं ते म्हणजे दुबई. वास्तविक, दुबईमध्ये सोने खरेदीवर कोणताही कर नाही, त्यामुळे येथे सोने खूप स्वस्त आहे.
सध्या दुबईत सोन्याचा भाव ₹ 67686 प्रति 10 ग्रॅम आहे. असं म्हटलं जातं की, दुबईमध्ये सोन्याची गुणवत्ता खूप चांगली असून दागिन्यांवर बारकाईने काम केले जाते.
दुबईच्या Deira सिटी सेंटरला गोल्ड हब म्हटलं जातं. इथे अनेक सोन्याची दुकानं आहेत. भारतीय सेलिब्रिटी आणि विविध देशांतील श्रीमंत लोक येथे खरेदी करतात.
सोन्याच्या बाबतीत थायलंड दुसऱ्या क्रमांकावर आहे. इथे चायना टाऊन सोन्याच्या दागिन्यांसाठी जगप्रसिद्ध आहे. बँकॉकमध्येही सोन्याचे दागिने अगदी कमी फरकाने मिळतात.
इंडोनेशियातही 24 कॅरेट सोन्याची किंमत 1330266 IDR (इंडोनेशियाई रुपया) आहे. म्हणजेच, ₹ 71880 प्रति 10 ग्रॅम. दुसरीकडे, भारतात 10 ग्रॅम सोने ₹ 77000 मध्ये उपलब्ध आहे.
कंबोडियाही दर्जेदार सोन्यासाठी प्रसिद्ध आहे. येथे सोन्याची किंमत भारताच्या तुलनेत कमी आहे. प्रति 10 ग्रॅम सोने सुमारे ₹ 71880 मध्ये उपलब्ध आहे.
हाँगकाँगमध्ये सोन्याची किंमत ₹ 72050 प्रति 10 ग्रॅम आहे. सोन्यावर कोणताही अतिरिक्त कर नसल्यामुळे येथे किंमत परवडणारी आहे.
स्वित्झर्लंड सोन्याच्या दागिन्यांच्या डिझाईन्ससाठी आणि स्वस्त किमतींसाठीही प्रसिद्ध आहे. सोन्याची घड्याळंही इथे खूप विकली जातात. येथे 24 कॅरेट सोन्याची प्रति 10 ग्रॅम किंमत ₹ 73580 आहे.