Pranali Kodre
छत्रपती शिवाजी महाराज यांचे बालपण कसं होतं, ते बालपणी कोणते खेळ खेळायचे याबाबतही कुतूहल आपल्याला असेल.
शिवरायांचे बालपण शिवनेरी, बैजपूर, पुणे अशा ठिकाणी गेले होते.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या बालपणाचे वर्णन कवी परमानंदानी शिवभारतात केले आहे.
कवी परमानंदानी यांनी केलेल्या वर्णनानुसार शिवराय देखील इतर अनेक लहान मुलांप्रमाणे प्रतिबिंबाशी खेळायचे, अंगावर धुळ माखायचे, माती चाखायचे. याशिवाय ते मातीच्या हत्ती आणि घोड्यांचेही खेळ खेळायचे.
शिवाजी महाराज यांचे बालपण निसर्गाच्या सानिध्यात गेल्याने ते मोर, पोपट, कोकीळ अशा पक्षाचे हुबेहुब आवाजही काढायचे आणि वाघाप्रमाणे डरकाळी फोडून इतरांना घाबरवायचे.
शिवाजी महाराज लहानपणी मातीचे किल्लेही तयार करायचे आणि हे माझे गड आहे, असं ही सर्वांना सांगत असे.
बालपणात शिवाजी महाराज चेंडू भोवरा आणि आंधळी कोशिंबीर हे खेळही आवडीने खेळत. त्याबरोबर ते वेगवेगळ्या प्रकारची सोंग घेऊनही इतरांशी खेळायचे.
शिवराय तटावरून रपेटही मारायचे. त्यामुळे बालपणी लेण्याद्री आणि आजुबाजूचा मुलूखही त्यांच्या नजरेखालून जात होता.