Saisimran Ghashi
केसातील कोंडा ही एक त्रासदायक समस्या आहे.
कोरडी त्वचा, खूप तेलकटपणा, खमीर संक्रमण, आणि काही विशिष्ट शॅम्पू ही कारणे असू शकतात.
अनेक प्रकारचे तेल कोंड्यावर उपचार करण्यासाठी प्रभावी ठरतात.
खोबरेल तेलात कापुर घालून तेल बनवा. अँटी-फंगल आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असल्याने कोंडा कमी करण्यास मदत करते.
खोबरेल तेलात आवळा किंवा पाऊडर घालून तेल बनवा. डोक्याची त्वचा निरोगी ठेवते आणि कोंडा कमी करण्यास मदत करते.
खोबरेल तेलात कडूलिंबाचा पाला किंवा पावडर घालून तेल बनवा आणि लावा. अँटी-सेप्टिक गुणधर्म असल्याने कोंडा आणि डोक्यात खाज कमी होते.
डोक्याच्या त्वचेवर हलक्या हाताने मसाज करा आणि काही वेळ ठेवा आणि धुवून टाका.
ही केवळ सामान्य माहिती आहे आम्ही याची पुष्टी करत नाही. गंभीर कोंड्याच्या समस्यांसाठी नेहमी डॉक्टरांचा सल्ला घ्या.