घरातील कोणत्या ठिकाणी फ्रीज ठेवणे ठरू शकते धोकादायक? जाणून घ्या

Aishwarya Musale

रेफ्रिजरेटर

सध्याच्या काळात रेफ्रिजरेटर ही आवश्यक गोष्ट झाली आहे. बर्फ, थंड पाणीच नव्हे तर खाद्यपदार्थ दीर्घकाळ ठेवण्यासाठी फ्रीजचा वापर वाढू लागला आहे. फ्रीजशिवाय कच्चे आणि शिजवलेली भाजी, फळे हे अधिक दिवस ठेवणे याची कल्पनाच कोणी करू शकत नाही.

फ्रीज लवकर खराब होतो

मात्र, फार कमी लोकांना फ्रीज नेमका कोणत्या ठिकाणी असावा याची योग्य माहिती नसते. त्यामुळे अनेकांचा फ्रीज फार लवकर खराब होतो.  

खराब होण्याची शक्यता

रेफ्रिजरेटर नेहमी आतून थंड असतो, बरेचदा लोक त्यात जास्त गरम वस्तू ठेवतात, ज्यामुळे तो खराब होण्याची शक्यता वाढते. त्याच वेळी, स्वयंपाकघरातील तापमान देखील जास्त असते, ज्यामुळे रेफ्रिजरेटर खराब होऊ शकते.

व्हेंटिलेशन

तुम्ही फ्रीज ठेवण्यासाठी योग्य जागा शोधत असाल जिथे तो वर्षानुवर्षे उत्तम प्रकारे काम करेल, तर तुम्ही तो बाल्कनी असलेल्या खोलीत ठेवू शकता. या खोलीत भरपूर वायुवीजन (व्हेंटिलेशन) आहे. तुमच्या फ्रीजमधून निघणारी उष्णता सहज बाहेर जाते.

बाल्कनी असलेली खोली

जर तुम्हाला तुमचा फ्रीज बराच काळ चांगल्या स्थितीत ठेवायचा असेल, तर वायुवीजन खूप महत्वाचे आहे आणि यासाठी बाल्कनी असलेली खोली चांगली जागा ठरू शकते.

उष्णता

जर तुम्ही फ्रीज खिडकी नसलेल्या खोलीत ठेवला असेल तर त्याची जागा तातडीने बदलावी. खिडकी असलेली खोली तुम्हाला बऱ्यापैकी, चांगल्याप्रकारे वायुवीजन देते. त्यामुळे फ्रीजमधून बाहेर पडणारी उष्णता सहजपणे खोलीच्या बाहेर निघून जाते. 

धोकादायक ठरू शकते

जर, तुम्ही खिडकी नसलेल्या ठिकाणी फ्रीज ठेवत असाल आणि त्या ठिकाणी वायुवीजन नसेल तर तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकते.

फ्रीज

याचा तुम्हाला त्रास होईलच शिवाय फ्रीजही लवकर खराब होण्याची भीती आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.