Saisimran Ghashi
थोडं चाललं तरी दम लागतोय? कदाचित तुमच्या शरीरात एखाद्या महत्त्वपूर्ण व्हिटॅमिनची कमतरता असेल.
शरीराला उर्जा देण्यासाठी व्हिटॅमिन्स खूप महत्त्वाचे असतात. यांची कमतरता झाल्यास थकवा आणि दम लागणे ही सामान्य लक्षणे आहेत.
व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स ही ऊर्जा उत्पादनासाठी महत्त्वाची असते. याची कमतरता झाल्यास शरीरात थकवा वाटणे, चिडचिड होणे आणि एकाग्रता कमी होणे अशी लक्षणे दिसून येतात.
व्हिटॅमिन बी 12 आयरनची कमतरता झाल्यासही थकवा आणि दम लागणे ही लक्षणे दिसून येतात. आयरन शरीरातील पेशांना ऑक्सिजन पोहोचवण्याचे काम करते.
थोडेसे काम केले किंवा चालणे झाले तरी दम लागणे,धाप लागणे या समस्या हल्ली जास्त प्रमाणात वाढल्या आहेत.
अन्नपदार्थातून मिळणारे व्हिटॅमिन्स हे आपल्या शरीरासाठी आवश्यक असतात. संतुलित आहार घेणे महत्त्वाचे आहे.
नियमित व्यायाम आणि योगासने करून आपण शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवू शकतो.
ही केवळ सामान्य माहिती आहे.आम्ही याची पुष्टी करत नाही. डॉक्टरांचा सल्ला घेऊन योग्य उपचार घेणे आवश्यक आहे.