Saisimran Ghashi
कमी भूक लागणे यामागे अनेक करणे असू शकतात. ज्यामध्ये एक आहे व्हिटॅमिनची कमतरता.
व्हिटॅमिन बी12 शरीराची ऊर्जा पातळी वाढवण्यास मदत करते. त्याची कमतरता झाल्यास थकवा आणि अशक्तपणा वाढतो, ज्यामुळे भूक कमी होते.
व्हिटॅमिन बी12 चयापचय प्रक्रिया नियमित ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. त्याची कमतरता झाल्यास चयापचय मंदावते, ज्यामुळे भूक कमी होते आणि वजन वाढण्याची शक्यता वाढते.
व्हिटॅमिन बी12 मज्जासंस्थेच्या आरोग्यासाठी आवश्यक आहे. त्याची कमतरता झाल्यास मज्जासंस्थेवर परिणाम होऊन भूक कमी होऊ शकते.
व्हिटॅमिन बी12 पाचन तंत्राच्या आरोग्यासाठी आवश्यक आहे. त्याची कमतरता झाल्यास अपचन, गॅस आणि बद्धकोष्ठता यांसारख्या समस्या उद्भवू शकतात, ज्यामुळे भूक कमी होते.
व्हिटॅमिन बी12 ची कमतरता तोंडाचे व्रण होण्याचे कारण बनू शकते. यामुळे चघळणे आणि अन्न खाणे कठीण होते.
व्हिटॅमिन बी12 ची कमतरता डिप्रेशन आणि चिंता या मानसिक समस्यांशी संबंधित आहे. यामुळे अन्न खाण्याची इच्छा कमी होते.
ही माहिती केवळ सामान्य माहितीसाठी आहे. कोणत्याही आरोग्य समस्यांसाठी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.