Saisimran Ghashi
हातापायात वारंवार मुंग्या येणं ही अनेकांमध्ये सामान्य समस्या असली तरी त्यामागे काही पोषण कमतरता असू शकतात.
व्हिटॅमिन बी12 च्या अभावामुळे नर्व्हस सिस्टीमवर परिणाम होतो, ज्यामुळे हातापायात मुंग्या येण्याची समस्या जाणवते.
मॅग्नेशियम नर्व्ह आणि मसल फंक्शनसाठी आवश्यक आहे; याची कमी असल्यास स्नायूंमध्ये ताण येतो आणि मुंग्या येऊ शकतात.
व्हिटॅमिन D चे कमी प्रमाण शरीरातील इलेक्ट्रोलाइट संतुलन बिघडवते, ज्यामुळे हातापायांत मुंग्या येतात.
या पोषक घटकांची कमतरता टाळण्यासाठी फळे, भाज्या, दूध, आणि अंडी यांचा आहारात समावेश करावा.
जर तुम्हाला सतत हातापायांत मुंग्या येत असतील तर डॉक्टरांचा सल्ला घेऊन आवश्यक तपासण्या आणि उपचार करावेत.
सतत हातापायांत मुंग्या येत असल्यास हे कोणत्या तरी रोगाचे संकेत असू शकतात.
ही केवळ सामान्य माहिती आहे. आम्ही याची पुष्टी करत नाही.