Saisimran Ghashi
सर्वकाळ थकलेले वाटणे आणि अशक्तपणा जाणवणे हे आपल्यापैकी बऱ्याच जणांना सहज वाटणारे अनुभव आहेत. पण यामागे खरे कारण काय असू शकते, याचा विचार केला आहे काय
कदाचित आपल्या शरीरात काही महत्त्वपूर्ण व्हिटॅमिनची कमतरता असावी.ज्यामुळे थकवा आणि अशक्तपणा येऊ शकतो.
रक्तपेशींची निर्मिती आणि मज्जासंस्थेचे योग्य कार्य यासाठी अत्यंत आवश्यक असलेले व्हिटॅमिन बी12 च्या कमतरतेमुळे थकवा आणि अशक्तपणा जाणवू शकतो.
शरीरात ऑक्सिजन वाहून नेण्याचे काम करणारे लोह (आयर्न) च्या कमतरतेमुळे अॅनिमिया होऊ शकते, ज्यामुळे सतत थकवा आणि श्वास घेण्यास त्रास होतो.
हाडांची घनता वाढवण्यास मदत करणारे व्हिटॅमिन डी च्या कमतरतेमुळे स्नायू दुखणे, मूड स्विंग्स आणि अशक्तपणा येऊ शकतो.
विविध प्रकारच्या फळे, भाज्या, धान्ये, मांस, दूध आणि दुधजन्य पदार्थ यांचा समावेश असलेला आहार घ्या.
व्हिटॅमिन डी मिळवण्यासाठी दररोज काही वेळ सूर्यप्रकाशात बसावे.
ही केवळ सामान्य माहिती आहे. जर तुम्हाला सतत थकवा आणि अशक्तपणा जाणवत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.