सकाळ डिजिटल टीम
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती फक्त पुण्यातच नाही तर संपूर्ण जगामध्ये प्रसिद्ध आहे
संपूर्ण जगातून मनोभावे दर्शन घेण्यासाठी लोक दगडूशेठ हलवाईच्या मंदिरामध्ये येत असतात
मात्र दगडूशेठ हलवाई नक्की कोण होते आणि या गणपतीचा इतिहास तुम्हाला माहिती आहे का?
तर झालं असं की ब्रिटिशांच्या काळात पुण्यामध्ये प्लेगची साथ आली. यावेळी प्रसिद्ध हलवाई दगडूशेठ यांचा मुलगा आणि पत्नी दोघेही प्लेगमुळे निधन पावले
या धक्क्यातून सावरण्यासाठी माधवनाथ महाराजांनी दगडूशेठ यांना सांगितले की, तुम्ही एक दत्ताची आणि एक गणपतीची मूर्ती तयार करा आणि त्या दोघांना आपल्या मुलांप्रमाणे सांभाळा भविष्यात ही दोन दैवते तुमचं नाव उज्वल करतील.
ठरल्याप्रमाणे दगडूशेठ यांनी या बनवल्या आणि लोकमान्य टिळक यांच्या हस्ते या मुर्त्यांची प्रतिष्ठापना करण्यात आली. आजही या मुर्त्यांमुळेच दगडूशेठ हलवाई यांचं नाव अमर आहे.