Anuradha Vipat
यंदा ‘बिग बॉस मराठी’चं पाचवं पर्व २८ जुलैपासून सुरू होणार आहे.
या पाचव्या सीझनचं होस्टिंग अभिनेता रितेश देशमुख करणार आहे.
आता पत्रकार परिषदेत संवाद साधताना रितेशने बऱ्याच गोष्टींबाबत खुलासा केला आहे.
यामध्ये तुमच्या घरातील बिग बॉस कोण? असा प्रश्न रितेश विचारण्यात आला
यावर उत्तर देताना रितेश म्हणाला, माझ्याच नव्हे तर प्रत्येकाच्या घरात एकच बिग बॉस असतो तो बॉस म्हणजे त्याची बायको
पुढे रितेश म्हणाला की, माझ्या आयुष्यात कोणतीही गोष्ट घडली तर मी सर्वात आधी जिनिलीयालाच सांगतो. तिचं मत हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचं असतं.
मी बिग बॉस करावं ही तिची मनापासून इच्छा होती कारण आम्ही दोघंही बिग बॉस शोचे खूप मोठे फॅन आहोत असंही पुढे रितेश म्हणाला