कार्तिक पुजारी
निवडणूक आयोगाने पश्चिम बंगालचे डीजीपी राजीव कुमार यांना पदावरुन हटवलं आहे.
राजीव कुमार यांनी तृणमूलला पाठिंबा दिल्याचा आरोप केला जातो.
सीबीआयने राजीव कुमार यांच्या घरावर छापा टाकला होता, तेव्हा ममतांनी धरणे आंदोलन केले होते.
शारदा चिट फंड प्रकरणी सीबीआयने राजीव कुमार यांच्या ठिकाणांवर छापा टाकला होता.
ममतांनी याविरोधात तब्बल ७० तास धरणे आंदोलन केले होते.
शारदा चिटफंड प्रकरणात राजीव कुमार यांची टीम आरोपींना पकडण्यासाठी जम्मू-काश्मीरमध्ये गेली होती.
यानंतर काही महिन्यांनी सुप्रीम कोर्टाने हे प्रकरण सीबीआयकडे सोपवलं होतं. पुराव्यांमध्ये छेडछाड केल्याचा आरोप राजीव कुमार यांच्यावर करण्यात आला होता.