कार्तिक पुजारी
अनुराधा पौडवाल यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्या प्रसिद्ध बॉलिवूड गायक आहेत. तसेत त्या आपल्या भक्तीगीतांसाठी प्रसिद्ध आहे.
त्यांनी हिंदी, तमिळ, उडिया, नेपाळी इत्यादी भाषांमधून गीत गायले आहेत.
१९७३ सालच्या अभिमान नावाच्या हिंदी चित्रपटातील एका संस्कृत श्लोकाच्या गायनातून यांचे पार्श्वगायन क्षेत्रात पदार्पण झाले
६९ वर्षीय अनुराधा पौडवाल या ९० दशकातील आपल्या भक्तीगीतांसाठी जास्त प्रसिद्ध आहेत.
त्यांचे लग्न १९६९ मध्ये अरुण पौडवाल यांच्यासोबत झालं होतं. ते एसडी बर्मन यांचे असिस्टंट आणि म्यूझिक कंम्पोझर होते.
त्यांना आदित्य नावाचा मुलगा आणि कविता नावाची एक मुलगी आहे. त्यांच्या मुलाचा काही वर्षांपूर्वी मृत्यू झालाय.
१९९१ मध्ये त्यांच्या पतीचे देखील निधन झाले आहे. अनुराधा पौडवाल यांनी अनेक पुरस्कार मिळाले आहेत